“हे शिवसेनेचं बदललेलं स्वरुप, मजबुरी घट्ट करण्याचा प्रयत्न असू शकतो”; फडणवीसांचा टोला

0

पणजी : कोरोनाची दुसरी लाट कायम असताना शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. गतवर्षी मोजकी नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आलेला दसरा मेळावा यंदाच्या वर्षी षण्मुखानंद सभागृहात होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, यावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, शिवसेनेचे हे बदललेले स्वरुप असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला महाविकास आघाडीचे नेते एकाच मंचावर येणार असे ऐकले. मला वाटते हे शिवसेनेचे बदलते स्वरुप आहे असे समजूया. कारण मजबुरी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत असल्याचे शिवसेना सांगत होती. आता हा प्रयत्न अधिक घट्ट होण्यासाठी असू शकतो, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. फडणवीस सध्या गोवा दौऱ्यावर असून, तेथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:39 PM 14-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here