कर्ज फेडतो, पण भारतात येणार नाही – विजय मल्ल्या

0

हिंदुस्थानातील काही बँकांकडून 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पोबारा करणारा विजय मल्ल्या आता बँकांचे सगळे पैसे परत द्यायला तयार झाला आहे. कर्ज फेडतो, पण हिंदुस्थानात येणार नाही, असे म्हणणे त्याने शुक्रवारी लंडनच्या कोर्टात मांडले. सध्या येथे त्याच्या विरोधात दोन न्यायमूर्तींसमोर प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. कर्ज घेतल्यानंतर पळून लंडनमध्ये जाऊन बसलेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थानने सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून जोर लावल्यामुळे मल्ल्या त्रासला आहे. सीबीआय आणि ईडी माझ्याशी ज्याप्रमाणे वागत आहे ते ठीक नाही. बँकांना मी विनंती करतो की, माझ्या कर्जाची 100 टक्के मूळ रक्कम लगेच परत घ्या, पण मी हिंदुस्थानात येऊ शकत नाही, असे मल्ल्या म्हणाला. सुनावणीसाठी तो येथील रॉयल कोर्ट ऑफ जस्टीस येथे पोहोचला होता. 9 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली तसेच हवाला प्रकरणी हिंदुस्थानला विजय मल्ल्या हवा आहे. मुख्य न्यायमूर्ती स्टीफन ईरकिन आणि न्यायमूर्ती एलिजाबेथ लाइंग यांच्यासमोरील सुनावणीत गुरुवारी त्याचा वकील मार्क समर्स म्हणाला की, मल्ल्याने बँकांना जाणूनबुजून लाभाबाबत चुकीची माहिती दिली.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here