राज्यसभा निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले उमेदवारी अर्ज भरणार

0


राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांसोबत शुक्रवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची बैठक झाली. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच बैठकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचीही भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. 2 एप्रिल रोजी उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे. शहांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आणि धनंजय महाडिक उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीसह राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील वर्तमान राजकीय स्थितीवरही राज्यातील नेत्यांनी अमित शहा यांना माहिती दिली असल्याचं कळतंय. दरम्यान, भाजप नेत्यांनी दुपारी पक्ष मुख्यालयात जावून राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ही भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती. राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. यासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here