शिवसेना नेते रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना पत्र, दसरा मेळाव्याबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

0

मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अनिल परब यांच्याबाबतच्या ऑडिओ क्लिपममुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज होणाऱ्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात येण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मेळाव्याला येत नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती ठीक नसल्यामुळे ते दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय कदम यांनी निर्णय घेतला आहे. मागील तीन महिन्यांपासून रामदास कदम आजारी आहेत. रामदास कदमांवर ब्रीज कँडी रुग्णालयात आणि घरी दोन महिने उपचार सुरू होते. संसर्ग वाढू नये, यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यामुळेच दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं कदम यांनी पत्राद्वारे कळवलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:55 PM 15-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here