सिडनीच्या रस्त्यावर धावतेय दिल्लीतील टॅक्सी

0

सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनी शहराच्या रस्त्यावर सध्या दिल्लीतील एक टॅक्सी दिमाखात धावत आहे ऑस्ट्रेलियातील एक तरुण जो भारतीय टॅक्सीचा चाहता आहे त्याने गेले तीन वर्ष सतत परिश्रम करून ही टॅक्सी तयार केली असून तो ही टॅक्सी दिमाखात रस्त्यावरून फिरवत आहे. जेमी असे या तरुणाचे नाव असून काही वर्षांपूर्वी त्याने भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील कार शो मध्ये काळा पिवळा रंग असलेली टॅक्सी बघितली आणि त्याला ती खूप आवडली आपल्या देशातील रस्त्यावरून ही कार धावावी असे त्याला वाटत होते पण काही कायदेशीर कटकटीमुळे भारतातील टॅक्सी ऑस्ट्रेलियात नेणे शक्य नव्हते मुळचा ब्रिटनचा असलेला जेमी हा व्यवसायाने व्हिज्युअल कम्युनिकेशन कन्सल्टंट आहे. या आधीच त्याच्याकडे लंडनमधील क्लासिक टॅक्सी तसेच ही भारतीय काळी पिवळी टॅक्सी आपल्याकडे असावी असे त्याला वाटत होते त्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले त्याला जी काळी पिवळी टॅक्सी होती हवी होती ती ॲम्बेसिडर कंपनीची होती पण अँबेसिडर कंपनीने 2014 मध्येच आपल्या मोटारींचे उत्पादन थांबवले होते जेमीने भारतातील अनेक शहरांमध्ये चौकशी करून या कारचे पार्ट मिळतात का ते पाहिले आणि अमृतसर मध्ये त्याला कारचे काही सुटे भाग उपलब्ध झाले या मोटारीसाठी काही पार्ट त्याने ऑस्ट्रेलियातील मॉरिस ऑक्सफर्ड या मोटारीचे वापरले या दोन्ही मोटारींच्या सुट्ट्या पार्टचा वापर करून एक नवी काळी पिवळी टॅक्सी तयार करण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली ही टॅक्सी संपूर्णपणे भारतीय पद्धतीने तयार करण्यात आली असून त्याच्या डॅशबोर्डवर भगवान गणेश आणि गुरुनानक यांच्या प्रतिमाही आहेत त्या शिवाय या टॉक्सिला प्लास्टिकचा लिंबू आणि मिरची ही अडकवण्यात आली आहे. गेल्या डिसेंबर पासून ही टॅक्सी सिडनी मधील रस्त्यावरून धावत असून ते लोकांचेही आकर्षणाचे केंद्र झाले आहे या टॅक्सी सोबत फोटो काढून घेणे लोकांना आवडते त्याशिवाय अनेक मालिका किंवा चित्रपटांच्या शुटींगमध्ये ही टॅक्सी आता वापरली जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:37 PM 15-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here