विनोद कांबळीने स्वीकारले तेंडुलकरचे आव्हान

0

क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या मास्टर ब्लास्टर म्हणजेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या मैत्रीचे किस्से काही कमी नाहीत. सोशल मीडियाच्या वर्तुळात तर, ही मित्रांची जोडी कायम चर्चेचा विषय ठरते. यातच आता आणखी एक भर पडली आहे. कारण, विनोद कांबळीने सचिनचं आव्हान स्वीकारत एक धमाकेदार रॅप तयार केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सचिनने ‘क्रिकेटवाली बिट’पे एक रॅप साँग तयार करण्याचं आव्हान विनोदला दिलं होतं. जे स्वीकारत विनोदने अतिशय फिल्मी अंदाजात रॅप सादर केलं आहे. मुख्य म्हणजे खुद्द सचिनलाही विनोदचा हा ‘यो’ अंदाज अतिशय भावला असून, त्याने आपल्या मित्राची खास शैलीत प्रशंसा केली आहे. विनोद कांबळीने रॅप साँगचा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबत कॅप्शनही लिहिलं आहे. ‘डियर मास्टर ब्लास्टर… एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुदकी भी नही सुनता… कसं वाटलं?’, असं विचारत विनोदने सचिनपुढे हे रॅप सादर केलं.

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here