भारत दौऱ्यासाठी मी उत्सुक – डोनाल्ड ट्रम्प

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा आपल्या भारत दौऱ्याबाबत भाष्य केले आहे. ट्विटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना ट्रंप म्हणाले, ” भारत दौऱ्याबाबत मी उत्सुक आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक सामाजिक माध्यमांवर सक्रिय असून जनतेशी विविध प्रकारे संवाद साधत असतात. “पंतप्रधान नरेंद मोदी माझे मित्र आहेत तसेच ते महान गृहस्थ आहेत. या महिन्याच्या शेवटी आम्ही भारताला जाणार आहे. या दौऱ्याबाबत मी उत्सुक आहे असे यापूर्वी ते म्हणाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 24 -25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येत आहेत. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिआ ट्रम्प देखील उपस्थित राहणार आहेत. याबाबत व्हाईट हाऊस आणि पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 24-25 फेब्रुवारीला नवी दिल्ली आणि गुजरातच्या अहमदाबाद येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होतील आणि समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधतील. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथील साबरमती आश्रमास भेट देणार आहेत तसेच प्रसिद्ध साबरमती नदीच्या किनारी म्हणजे रिव्हर फ्रंटवर फेरफटका मारत बातचीत करणार आहेत. अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अमेरिकेतल्या ह्युस्टन येथे 22 सप्टेंबरला झालेल्या भारतीय समुदायाच्या ‘हाऊडी मोदी’ या विशेष कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी झाले होते. 50 हजारांहून अधिक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here