सीएए आणि एनआरसी च्या विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. यातील काही आंदोलने शांततेच्या मार्गाने होत आहेत तर काही आंदोलनांना हिंसक वळण लागले आहे. दरम्यान, सुधारित सीएएविरोधात आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांकडून नाकारण्यात आल्यानं औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी ‘कायद्याविरोधात आंदोलन केल्यानं कोणी गद्दार, देशद्रोही ठरत नाही’, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी म्हटलं.
