दीक्षाभूमीवर धम्मचक्रप्रवर्तन सोहळा उत्साहात

0

नागपूर : नागपुरातील दीक्षाभूमीत 65 व्या धम्मचक्रप्रवर्तन सोहळ्यानिमित्त अनुयायांनी अभिवादनासाठी भेट दिली. कोरोनामुळे दोन वर्षांपासून प्रतिबंध होता. परंतु, यंदा लसीकरण झालेल्या अनुयायांना दीक्षाभूमित प्रवेश देण्यात आला होता. कोरोनाचे सावट कायम असल्याने कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक होते. त्यामुळे बहुतेकांनी घरूनच अभिवादन करण्याला प्राधान्य देत अनावश्यक गर्दी टाळली. त्यामुळे नेहमीपेक्षा केवळ 15 टक्के लोकांनी हजेरी लावल्याचे दिसून आले. दसऱ्याच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी दीक्षाभूमीवर महामानव डॉ. आंबेडकर, तथागत बुद्ध व पंचशील धम्मध्वजाला परेडसह मानवंदना दिली. त्यानंतर परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि निवडक भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेत बाबासाहेब व तथागताच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भन्ते नागदीपंकर, डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, आनंद फुलझेले, नामदेव सुटे, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्राचार्य डॉ. भुनेश्वरी मेहेरे, डॉ. ए. पी. जोशी, समता सैनिक दलाचे कमांडर पृथ्वीराज मोटघरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ. रवींद्र तिरपुडे, मधुकरराव मेश्राम, चंद्रहास सुटे आणि दीक्षाभूमी परिवारातील निवडक सदस्य उपस्थित होते. यानंतर दिवसभर अभिवादनाचा क्रम सुरू होता. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश आणि दक्षिणेकडील अनुयायीसुद्धा पोहचले. सकाळपासून अतिशय शांततेत लोक अभिवादन करण्यासाठी पोहचत होते, जे रात्रीपर्यंत सुरू होते. वस्त्यावस्त्यामधील बौद्ध विहारांमध्ये वंदना व धम्मदेसनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here