आयपीएलचं पुढचं पर्व एम.एस. धोनी खेळणार का?; धोनीने दिलं ‘हे’ उत्तर

0

आयपीएलचा अंतिम सामना काल चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघात खेळवला गेला. मात्र दमदार सुरूवातीनंतर देखील कोलकाताला विजय मिळवता आला नाही. त्यामुळे चेन्नईने आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला आहे. त्यानंतर धोनीने अजून एक महत्त्वाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. धोनीने यावर्षीचा विजय आपल्या नावावर केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे. तो म्हणजे धोनी पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का? सामन्यानंतर जेव्हा कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी धोनीला याचसंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा धोनीने अत्यंत हुशारीने प्रश्नाचं उत्तर दिलं. ‘धोनी हा जो तू वारसा सोडून जात आहे. त्याचा तुला अभिमान वाटेल का?’ असा फिरकी टाकणारा सवाल हर्षा भोगले यांनी विचारला होता. त्यावर धोनीने ‘मी आत्ताच माझा कोणताही वारसा सोडून जात नाहीये’ असं उत्तर दिलं. धोनीच्या या उत्तरानंतर त्याच्या चाहत्यांनी धोनी पुढचा सामना खेळणार, असा अंदाज बांधला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here