वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

0

गुहागर : विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वरमधील प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातर्फे दि. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी अँडव्हान्स्ड मटेरियल्स अॅण्ड अॅप्लिकेशनन्स या राष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या महाविद्यालयात विविध उपक्रम नेहमीच राबविले जात असल्याचे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले. या ई-परिषदेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व उद्योजक यांच्यामध्ये अॅडव्हान्स्ड मटेरियल्स या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या नवनवीन संशोधनाची व त्याच्या वापराची माहिती करून देणे हा आहे. या परिषदेमध्ये तज्ज्ञ म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरचे प्रा. विकास पाटीलव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे प्रा. एल. एन. सिंग यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच आपण केलेल्या संशोधन कार्याचे प्रकाशन राष्ट्रीय नियतकालिकेमध्ये करण्यात येणार आहे. या परिषदेतील सहभागी सदस्याला ई-प्रमाणपत्र दिले जाईल. या संधीचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, संशोधक व उद्योजक यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील डॉ. अमित माने, प्रा. औदुंबर पाटकर यांच्याशी संपर्क साधावा. या ई-परिषदेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here