‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’

0

नाशिक : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं या विधानावरुन राजकीय चर्चा रंगल्या आहेत. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही फडणवीसांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुणांची तुलना केली आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. ‘दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसारखी फटकेबाजी केली. त्यात तथ्य आहे. कोणाच्या घरात पाच- सात दिवस धाडी सुरू आहेत हे कोणालाच आवडत नाही. पण त्यांचं ते कामच आहे. त्यावर मुख्यमंत्री बोलले. पण विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांना उत्तर देणं देवेंद्र फडणवीसांना आवश्यकच आहे. त्यामुळं त्यांनी ते दिलं दिलं, असं सांगतानाच एक गुण जो फडणवीसांमध्ये होता तो उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये. कारण फडणवीस सरकारच्या काळात कोणत्याही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला की ते ताबोडतोब क्लिन चिट द्यायचे. त्याच्यामुळं २० – २० वेळा मंत्र्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप झाल्यानंतर लगेच क्लिनचिट. पोलिसांचे जे प्रमुख होते ते आगोदरच क्लिन चिट द्यायचे. मग खालच्या लोकांना पण द्यावेच लागणार. फडणवीसांचा हाच गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही. फडणवीस क्लिन चिट मास्टर आहेत, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. तसंच, हा अवगुण आहे असं मी माजी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलू शकत नाही,’ असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:23 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here