मोकाट कुत्रे मृत्यू प्रकरणातील संशयिताची जामिनावर सुटका

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील 21 कुत्र्यांना अन्नात विष घालून मारल्याचा संशयावरून अटक केलेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्याला शहर पोलिसांनी अटक केले. या कर्मचाऱ्याला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शहरात 21 कुत्रे एकाच दिवशी मृत झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी रत्नागिरी नगर परिषदेचा माजी कर्मचारी सिद्धार्थ गोविंद कदम (वय 61 वर्षे राहणार मारुती मंदिर रत्नागिरी) याला गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here