रखडलेल्या कामामुळे जुन्या कंपनीला टर्मिनेट करुन नवीन कंपनीला संधी

0

मुंबई-गोवा महामार्गाच्या एमईपी कंपनीकडून रखडलेले काम काढून आता हान इन्फ्रा सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने कामाला प्रारंभ केला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ रखडलेल्या बावनदी ते आरवली आणि बावनदी ते वाकेड या भागाचे काम कधी पूर्ण होणार याकडे रत्नागिरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये आरवली ते बावनदी आणि बावनदी ते वाकेड या भागाच्या कामाची जबाबदारी असलेल्या एमईपीने गेल्या तीन वर्षात दहा टक्केही केले नव्हते. या कंपनीबाबत बांधकाम विभागाकडून सातत्याने स्मरणपत्रे देण्यात आली होती. त्यानंतर याचा अहवाल केंद्र सरकारकडेही देण्यात आला होता. त्यानंतर काम सुरू करण्यासाठी असलेली मुदत संपायला तीन महिन्याचा कालावधी असतानाच नव्याने संधी न देता एमईपीला टर्मिनेट करुन नवीन एजन्सी नेमण्याचे पत्र मुख्य अभियंत्यांनी केंद्र शासनाला दिले होते. त्यानंतर ही नवी कंपनी नेमण्यात आली आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here