रेल्वेमंत्र्यांना आणा नाहीतर ज्यो बायडन यांना प्रचाराला आणा; आम्ही तुम्हाला घाबरत नाही : संजय राऊत

0

सिल्वासा : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता पोटनिवडणूक लागली आहे. डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आहेत. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “रेल्वेमंत्री इथं प्रचाराला येत आहेत. इतर मंत्रीही येतील. हवं तर ज्यो बायडन यांना प्रचाराला बोलवा. शिवसेना कुणाला घाबरत नाही”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:56 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here