‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत हा माझाच आग्रह’ : शरद पवार

0

पुणे : आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असं आमदारांच्या बैठकीत सांगितले होते, ही माहितीही पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुरवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदास त्यांनी नकार दिला होता. पण आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला, असं शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, ही माहिती पवार यांनी दिली. राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:11 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here