आरक्षणाच्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांंचं मोठं विधान, म्हणाले…

0

नागपूर : ’आपल्या देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. मुळात सरकारी नोकर्‍याच नाही तर त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झाला आहे. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे,’ असे रोखठोक मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात व्यक्त केले. वनराई फाऊंडेशनच्या वतीने कमानी ट्युब्जच्या अध्यक्षा पद्मश्री कल्पना सरोज यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी गडकरी बोलत होते. ‘तंत्रज्ञानामुळे रोजगार आणि पैसा मिळतो. येणारा काळा हा ड्रोन तंत्रज्ञानाचा आहे आणि त्यामुळे आपले जगणे बदलणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणारा उद्योजक बनू शकतो आणि त्याचा कोणत्याही जात, पंथ, धर्म, भाषेशी संबंध नाही. व्यक्तीच्या चांगुलपणाचा आणि गुणवत्तेचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे विविध विषय शिकवणारी महाविद्यालये आहेत. पण, उद्योजकता शिकवणार्‍या संस्था नाहीत. ज्याला बघावे त्याला, शाळा किंवा कॉलेज हवे हसते. दुसरा व्यवसाय करण्याची तयारी नसते,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:25 PM 16-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here