सत्ता गेल्यामुळे भाजपाची तडफडणाऱ्या माशाप्रमाणे अवस्था – सुनील तटकरे

0

आता आम्ही मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागलो आहोत, या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ताशेरे ओढले आहेत. ‘अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही. त्या भाजपच्या आमदारांना पुन्हा निवडणुकीत काही स्वारस्य असेल, असं वाटत नाही. सत्तेपासून बाजूला गेल्याने माशाची जशी पाण्यासाठी तडफड होते, तशी भाजपची अवस्था झाली आहे’, असं म्हणत सुनील तटकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here