राजिवडा येथे गळ्यातील मंगळसूत्र आणि दहा हजार रुपये हिसकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील राजीवडा गावात महिलांना मारहाण करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मुलांना मारणार्‍या गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी गेलेल्या आईलाही अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नुरजहाँ मुजीब पावसकर आणि त्यांची मुले इबादुल्ला व कदर यांना दुखापती झाल्या. ही मारहाण करताना गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दहा हजार रूपये असलेला बटवा हिसकावून घेण्यात आल्याचे शहर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दीड महिन्यांपूर्वी याच गुन्ह्यातील दोन आरोपींनी माजी नगरसेवक अब्दुल बिजली खान व मुलगी तौफिका यांना मारहाण केली होती.
राजीवडा मच्छीमार्केटजवळ गावातीलच इनायत युसूफ मुल्ला, मुबीन युसूफ मुल्ला, मुस्तकीन युसूफ मुल्ला, तन्वीर युसूफ मुल्ला हे एका तरुणाला मारहाण करत होते. हे भांडण सोडवण्यासाठी इबादुल्ला पावसकर आणि कदर पावसकर गेले असता त्या दोघांनाही चौघा आरोपींकडून मारहाण केली जाऊ लागली. मच्छीमार्केटमध्ये व्यवसाय करणार्‍या नुरजहाँ पावसकर यांना त्यांच्या मुलांना मारहाण केली जात असल्याचे दिसले. मुलांना गुंडांच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्या पुढे गेल्या असता चौघा आरोपींनी त्या मुलांच्या आईलाही मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दहा हजार रुपये असलेला बटवा हिसकावण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजीवडा मच्छी मार्केटजवळ महिलेला मारहाण करणार्‍या चार आरोपींपैकी मुस्तकीन मुल्ला व तन्वीर मुल्ला यांनी दीड महिन्यांपूर्वी माजी नगरसेवकासह त्यांची मुलगी तौफिका हिलाही मारहाण केली होती. उधारीची मागणी केल्याने ही मारहाण झाली. यावेळी तौफिका यांच्याही गळ्यातील मंगळसूत्र 3200 रूपये असलेली पर्स हिसकावण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. त्यानुसार शहर पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. दोन दिवसांच्या जेलवारीनंतर त्यांना जामीन झाला होता. आता पुन्हा अशीच मारहाण झाल्याने राजीवड्यातील गुंडांचा उच्छाद पोलिसांनी रोखावा, अशी मागणी गावातून होत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:39 PM 16/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here