कीर्तीनगर येथे रस्ता ओलांडणाऱ्या बालिकेला धडक देणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : बेदरकारपणे कार चालवून रस्ता क्रॉस करणाऱ्या बालिकेला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना बुधवार १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वा. कीर्तीनगर येथे घडली. अनामुल्ला अल्ताफ वागले (२१, रा. ओसवाल नगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. या अपघातात सिद्रा सर्फराज पावसकर (९, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी) असे जखमी बालिकेचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी अनामुल्ला आपल्या ताब्यातील ऑल्टो कार (एमएच-०४-सीजी-३६६५) घेऊन घरी जात असताना कीर्तीनगर येथील मोरीजवळ हा अपघात झाला. अधिक तपास पोलीस हवालदार वीर करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:58 AM 18-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here