‘बाबांनो, विराट कोहलीसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंका’; भारताच्या माजी खेळाडूची टीम इंडियाला विनवणी

0

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या Round 1 मधील पहिल्याच सामन्यात ओमाननं १० विकेट्स राखून पापुआ न्यू गिनीचा पराभव करताना इतिहास घडवला. सुपर १२ चे सामने २३ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत आणि २४ ऑक्टोबरला भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा वर्ल्ड कप विराट कोहलीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या स्पर्धेनंतर तो टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. त्यामुळे विराटही आयसीसी स्पर्धांचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानं विराट कोहलीसाठी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंका, अशी विनवणी केली आहे. भारतानं २००७ साली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावला होता आणि त्यानंतर टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली आहे. विराटला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. ”आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला मी एकच संदेश देऊ इच्छितो, तो म्हणजे विराट कोहलीसाठी जिंका. कर्णधार म्हणून त्याची ही अखेरची स्पर्धा आहे आणि त्यामुळे सर्वांनी मिळून त्याला विजयी गिफ्ट द्या. आपण हे करू शकतो, असा विश्वास त्यानं सहकाऱ्यांना दाखवला पाहिजे आणि आपण सर्वांनी त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं,”असे सुरेश रैना म्हणाला.

भारतीय संघ – विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल. नेट गोलंदाज – आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम.

भारतीय संघाचे वेळापत्रक

२४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर – भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर – भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर – भारत वि. ब गटाती अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर – भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:56 PM 18-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here