भाजपानेच धाडीची नवी संस्कृती सुरू केली : अॅड. प्रकाश आंबेडकर

0

नागपूर : पुरावे असतील तर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई जरूर व्हावी. परंतु, आज छापे घालून खळबळ निर्माण केली जाते. अनेक प्रकरणात असे प्रकार उघडकीस आले. अशा छाप्यांमुळे एखाद्याचे राजकीय जीवन उद्धस्त होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित असावी असे सांगतानाच भाजपनेच धाडीची नवी संस्कृत सुरू केली, असा थेट आरोप वंचितचे नेते व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत केला. अशा अधिकाऱ्यांविरोधात दोन वर्षात कुणीही फौजदारी वा तक्रार करून चौकशीची मागणी केली नाही, असे ते म्हणाले. तर, आयकर धाड प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १०५० कोटीचा आकडा आला कुठून असा सवाल करीत त्यांनी बोलू नये तर पुरावे द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित असावी असे सांगतानाच भाजपनेच धाडीची नवी संस्कृत सुरू केली, असा थेट आरोप वंचितचे नेते व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रपरिषदेत केला. अशा अधिकाऱ्यांविरोधात दोन वर्षात कुणीही फौजदारी वा तक्रार करून चौकशीची मागणी केली नाही, असे ते म्हणाले. तर, आयकर धाड प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १०५० कोटीचा आकडा आला कुठून असा सवाल करीत त्यांनी बोलू नये तर पुरावे द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर आपण सर्व माध्यमे व संबंधीत विभागाची माहिती चाळली. त्यात हा आकडा कुठेही सापडला नाही. तो त्यांच्याकडे आला कुठून ? खरे असेल तर त्यांनीच पुरावे सादर केले पाहिजे. सामान्य माणसाला यामागचा राजकीय हेतू कळतो. त्यांनाही आता सवय झाली आहे. करमणूक म्हणून ते याकडे बघत असल्याचा टोलाही अॅड. आंबेडकर यांनी लगावला. यापूवीं सुखराम, टू जी स्पेक्ट्रम व इतरही भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणात तर न्यायालयाने पुरावे मागितले. ते शेवटपर्यंत मिळाले नाहीत. टू जी स्पेक्ट्रमप्रकरणीही अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर अखेर न्यायालयालाच याचिका निकाली काढावी लागली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केंद्रात २०१४ मध्ये भाजप सत्तेत आली. त्यानंतर ईडी, आयकर व इतर यंत्रणाचा गैरवापर सुरू झाला. एखाद्याला राजकीय आयुष्यातून उठविण्याचा हा प्रकार आहे. चौकशी समिती वा आयोग बसवून प्रकरणे दीर्घकाळ ठेवले जाते, अशी खंत अॅड. आंबेडकर यांनी बोलून दाखविली. नवाब मलिक यांनीही त्यांच्या जावयावरील कारवाई विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, याकडे अॅड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले.
मनपा निवडणुकीसाठी वारंवार रचना बदलण्याचा अधिकार विधीमंडळाला आहे का ? हे ठरले पाहिजे. न्यायालयात याविरोधात याचिका होतील, तेव्हा यावर निर्णय होणे अपेक्षीत आहे. तर, निवडणूकीसाठी ७० लाख खर्च करणाऱ्यांची आयकर चौकशी व्हावी. एवढ्या निधीची विकासकामे कुठेही होत नाही. ही राजकारणातील गुंतवणूक आहे. हा खर्च चौकशीतून पुढे यायला हवा. अन्यथा हा भ्रष्टाचाराचा प्रकार असल्याचे मानले जाईल. राजकारणातील भ्रष्टाचाराची प्रकरणे तातडीने निकाली निघावीत, अशी अपेक्षाही अॅड. आंबेडकर यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:40 PM 18-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here