कोजागिरीला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांसाठी करणार प्रार्थना

0

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जीवनातील एक हजारावी पौर्णिमा यंदा असेल. ही शरद म्हणजेच कोजिगीरी पौर्णिमा आहे, याचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मंगळवारी (ता. 19) प्रार्थना करणार आहेत. बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांनी आज या बाबत माहिती दिली. शरद पवार यंदा 81 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही त्यांच्या जीवनातील एक हजारावी पौर्णिमा असणार आहे. हे औचित्य साधून कार्यकर्त्यांकडून प्रार्थना, नमाजपठण, होमहवन, अभिषेक केले जाणार आहे. शरद पवार यांच्या जीवनातील हा योग ख-या अर्थाने दुग्धशर्करा योग असेल, त्या मुळे या निमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्य व आरोग्यासाठी कार्यकर्ते हा उपक्रम राबविला जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:57 PM 18-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here