दापोलीत एसटी बसमधून डिझेलची चोरी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

0

दापोली : रत्नागिरी-केळशी या केळशी येथे वस्तीला असलेल्या एस.टी. बसमधून अज्ञात इसमाने डिझेल टाकीतून तेरा हजार रुपये किमतीचे सुमारे १३० लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून, याबाबत दापोली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी-केळशी एसटी बस क्रमांक (एमएच १४ बी. टी. २५६८) ही बस चालक बालाजी कोळी हे रत्नागिरी येथून केळशीला घेऊन आले होते. ही बस वस्तीची असल्याने सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास केळशी येथे बस पोहचल्यावर चालक बालाजी कोळी हे बस एका बाजूला लावून जेवायला गेले असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसच्या डिझेल टाकीचे लॉक काढून आतील १३ हजार रुपये किमतीचे डिझेल चोरून नेले. ही घटना चालक कोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल चौरे हे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here