पवारांवर पीएचडी करायचीय? मग गाईड तुमच्या बुद्धिमत्तेची तपासणी करून ठरवेल; परबांचा पाटलांना टोला

0

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करणार असल्याचे वक्तव्य केले होते. अनिल परब यांनी या विधानाची खिल्ली उडवली. पीएचडी करायच्या अगोदर तुमचा गाईड बुद्धीमत्ता बघतो. जो त्यांचा गाईड असेल, त्यांच्या बुद्धीची त्यांनी तपासणी करावी. मी पीएचडी केली आहे. माझ्या बुद्धीमत्तेची माझ्या गाईडनी तपासणी केली होती, असे म्हणत परब यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. आता चंद्रकांत पाटलांचा गाईड त्यांची तपासणी करेल आणि ठरवेल शरद पवारांवर पीएचडी केली जाऊ शकते का? अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटे काढले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here