आमदार योगेश कदम यांनी साधला देवघर येथील ग्रामस्थांशी संवाद

0

खेड : तालुक्यातील देवघर ग्रामस्थांशी आमदार योगेश कदम यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासनही दिले. देवगड बंदरवाडीच्या नवीन पुलाचे काम लवकरच मंजूर करण्यात येईल, असे अभिवचनही ग्रामस्थांना दिले. बंदरवाडी मंदिर ते देवघर गवळवाडीमार्गे देवघर वाक्षेपवाडी रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार कदम यांच्याकडे केली. ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार योगेश कदम यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख विजय जाधव, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, माजी उपसभापती रवींद्र मोरे, सौ. सुप्रिया पवार, प्रभावती भुवड, ज्ञानदेव निकम, राजेंद्र शेलार, भरत महाडिक, नामदेव जाधव, सुरेश मोरे यांच्यासह शिवसैनिक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here