राष्ट्र घडविण्यासाठी वाचन संस्कार आवश्यक : सुहास धुपकर

0

लांजा : वाचनाने प्रगल्भ झालेली माणसे हे देशाचे फार मोठे वैभव आहे. आपल्याला हे वैभव परत मिळवायचे किंवा राखायचे असेल तर येणाऱ्या पिढीवर बालवयातच वाचनसंस्कार रुजवावे लागतील, असे प्रतिपादन वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने सुहास धुपकर यांनी केले. लोकमान्य वाचनालय लांजा येथे भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी ज्येष्ठ वाचक सुहास धुपकर, वाचनालयाचे संचालक विजय हटकर, कोकणगाभा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक शिरिष झारापकर, सतीश पवार, तेंडुलकर, रामचंद्र लांजेकर, उपशेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. झारापकर म्हणाले की, एकेकाळी प्रत्येक शहराची वर्धिष्णू केंद्रे असलेल्या वाचनालयाकडे आजच्या पिढीने पाठ फिरविल्याचे दिसते. विदेशात मात्र वाचनालयात कॉफी शॉप असल्याने तिथली पिढी कॉफी पिण्यासाठी वाचनालयात आल्यावर पुस्तकांकडे वळल्याचे सिद्ध झाले आहे. आपल्या देशातील पिढीला वाचनालयाकडे पुन्हा वळविण्यासाठी वाचनसंस्थांना कल्पक बदल करावे लागतील. यावेळी लोकमान्य वाचनालयाची वाटचाल व संस्थेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती संचालक विजय हटकर यांनी दिली. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन वाचकांसाठी मांडण्यात आले होते. रामचंद्र लांजेकर यांनी आभार मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here