राज्यात आणि देशात काँग्रेस हाच सक्षम पर्याय : नाना पटोले

0

मुंबई : काँग्रेस पक्ष देशातील सर्वात मोठा पक्ष असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षासारख्या पोकळ घोषणा देणारा पक्ष नसून खऱ्या अर्थाने सबका साथ देणारा पक्ष असल्यानेच काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व जाती धर्माला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम काँग्रेसमध्ये केले जाते. सर्वांच्या विकासाठी झटणारा काँग्रेस पक्ष हाच देशात व राज्यात सक्षम पर्याय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे अहमदनगर जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विविधमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय बनसोडे, जयप्रकाश छाजेड, शरद आहेर, सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, भाईजान आदि उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:18 PM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here