कर्करोगाचे वेळीच निदान ही या रोगावर मात करण्याची गुरुकिल्ली : डॉ. गोरासिया

0

चिपळूण : स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. मात्र, यात घाबरण्याचे कारण नाही. कारण वेळीच निदान हीच या रोगावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन येथील ऑनको लाईफ कॅसर केअर सेंटरच्या डॉ. तेजल गोरासिया यांनी केले. कर्करोगाबाबत ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी जनजागृती केली जाते, त्या अंतर्गत त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. गोरासिया म्हणाल्या, आज शहरी भारतातील २८ पैकी १ आणि ग्रामीण भारतातील ६० पैकी १ महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. सर्व नवीन कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २७% हून कमी आहे. तसेच सरासरी वयोगट हा ४० वर्षावरील आहे. स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण भारतात जास्त आहे. जेथे स्तनाच्या कर्करोगाच्या २ पैकी १ रुग्ण ५ वर्षांत मरण पावतात, यामागचे कारण म्हणजे स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसंबंधी असलेल्या जागरूकतेचा अभाव. त्यामुळे समुपदेशन अत्यंत महत्त्वाचे आहे. स्क्रीनिंग प्रोटोकॉल आणि जागरूकतेद्वारे त्याविषयी ज्ञान वेळीच स्तनाचा कर्करोग शोधण्यात मदत करते आणि म्हणूनच तो पूर्णपणे बरा होतो. कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्यातून बरे होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे महिलांनी त्रास जाणवल्यास कर्करोगाबाबत तपासणी वेळीच करून घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:01 PM 19-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here