उद्या केजरीवालांच्या शपथविधी सोहळ्याला मोदी लावणार का हजेरी?

0

दिल्लीच्या निवडणुकीत एकतर्फी बाजी मारल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल रविवारी (ता. १६) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले असून, या सोहळ्याला अन्य कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासह दिग्गज नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही हे विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपच्या सात खासदारांनाही या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले असून, पंतप्रधान मोदी या सोहळ्यात सहभागी होणार किंवा नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here