राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर येत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरील्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुरुवातीला श्रींचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजुर झालेल्या सुमारे 102 कोटींचा विकासकामांमधील प्रमुख कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडाबाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे.
