रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये आजपासून पर्यटन कार्यशाळा

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन कार्यशाळा आयोजित केली आहे. कोकणातील कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी, औद्योगिक नोंदणी व पर्यटन योजना या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे. पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन प्रशिक्षक मनोज हडवळे, समन्वयक संजय नाईक यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा होत आहे. दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. दापोली तालुक्यातील कर्दे येथील बीच पर्यटन बहूद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. पेडणेकर यांच्या संस्थेच्या ठिकाणी ही कार्यशाळा होईल. याच दिवशी सायंकाळी ४ वा. शहरातील न.प. समोरील सावरकर सभागृहात ग्लोबल चिपळूणचे राम रेडीज, सौ. ओक या सहभागी होतील. दि. २१ रोजी सकाळी ११ वा. रत्नागिरी येथील व्यंकटेश हॉल येथे रत्नागिरी जिल्हा हॉटेल असो.चे सुहास ठाकूरदेसाई, सायं. ४ वा. लांजा येथे कोकण गाभा कृषी पर्यटन केंद्राचे झारापकर, दि. २२ रोजी पिंगुळी, दुपारी कुडाळ, दि. २३ रोजी मालवण व वेंगुर्ला, तर दि. २४ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी व देवगड या ठिकाणी कार्यशाळा होणार आहे. यावेळी शासनाचे अधिकारी कोकणातील कृषी पर्यटन केंद्रांची नोंदणी व विविध शासकीय योजना या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:18 AM 20-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here