आज साजरा होणार नरवीर तानाजी मालुसरेंचा 350वा पुण्यतिथी सोहळा

0

आज नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठ या गावी 350 वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी सोहळा साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नरवीरांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या समाधी स्थळाचे यावेळी लोकार्पण करण्यात येणार आहे. नरवीरांच्या उमरठ या गावी पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, सुभाष देसाई असे अनेक मान्यवर यासाठी उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांचे समाधीस्थळ फुलांनी सजवण्यात आले आहे. उमरठ गावाला पर्यटन स्थळाचा ‘क’ दर्जा आहे. तो बदलून ‘ब’ दर्जा करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांची केली आहे. तर याबाबत मुख्यमंत्री ठाकरे काही घोषणा करतात का ? सर्वांचे लक्ष लागले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here