तेजस ठाकरे यांनी पश्चिम घाटात शोधल्या खेकड्याच्या पाच प्रजाती

0

कोल्हापूर : ‘घाटियाना’ कुळातील दोन आणि तीन प्रजाती या ‘सह्याद्रीना’ कुळातील अशा खेकड्यांच्या एकूण पाच नव्या प्रजातींचा शोध लागला असून या पाचही प्रजाती पश्चिम घाटातील गोड्या पाण्यात आढळल्या आहेत. या नव्या प्रजातींचा शोध लावण्यात तेजस उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांना यश आले आहे. तेजस यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. साताऱ्याजवळील कोयना परिसरात आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा घाटामध्ये यापैकी ‘घाटियाना ड्यूरेली’ च्या चार प्रजाती आढळल्या. तर ‘घाटियाना रौक्सी’ ही प्रजात गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये सापडली. सह्याद्रीमध्ये आढळणारी प्रजात ही प्रदेशनिष्ठ असून एक प्रजात गोवा तसेच कर्नाटकातील परिसरात आढळली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:19 PM 20-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here