आर्यन खानला दणका; कोर्टाने जामीन फेटाळला

0

मुंबई : ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्या. व्ही.व्ही. पाटील यांनी फेटाळून लावलाय. कॉर्डेलिया क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीतून आर्यन आणि त्याच्या साथीदारांना 2 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. आर्यनच्या जामीन अर्जावर आज, बुधवारी न्यायालयात प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आर्यनच्या व्हॉटसअप्प चॅट न्यायालयात सादर केल्या. या चॅटमध्ये ड्रग्जशी संबंधीत मॅसेजेस आहेत. त्यामुळे न्यायालयाने आर्यन आणि इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. सध्या आर्यन, अरबाज मर्चंट आमि मुनमुन धामेचा हे तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्यन आणि मर्चंट मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आणि धामेचा भायखळा महिला कारागृहात आहेत. आरोपी आर्यन खान आणि इतरांविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 (सी), 20 (बी), 27,28,29 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती एनसीबीने कोर्टात दिली होती. एनसीबीने हे संभाषण कोर्टात सादर केलं आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने कोर्टात ही माहिती दिली आहे. दरम्यान आर्यनचा जामीन नामंजूर झाल्यानंतर त्याच्या वकिलांनी हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED

(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:09 PM 20-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here