‘लोटिस्मा’तर्फे ओझरवाडी शाळेला ग्रंथभेट

0

रामपूर : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने वाचनालयाचे कोषाध्यक्ष विनायक ओक, सहकार्यवाह प्रकाश घायाळकर, ग्रंथपाल गौरी भोसले यांच्या हस्ते जीवन शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझरवाडी शाळेला बालसाहित्य प्रकारातील ५० वाचनीय पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक नंदकुमार चिवेलकर, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे, यासाठी वाचनालयाच्या वतीने प्रतिवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:16 PM 20-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here