कोकण नगर परिसरातून अॅनिमल हेल्पने ताब्यात घेतले चावरे कुत्रे

0

रत्नागिरी : शहरातील कोकण नगर भागात मागील आठ दिवसात सुमारे ३० नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती नगरसेवक मुसा काझी यांनी आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली. आता मात्र या विषयात अॅनिमल हेल्पग्रुपने पुढाकार घेतला आहे. अॅनिमल हेल्प ग्रुप गेले काही वर्ष रत्नागिरीत अपघातग्रस्त गाई गुरे आणि कुत्र्यांसाठी तसेच भटके कुत्रे आणि माणूस यांच्या मधील अडचणी कमी करण्यासाठी खूप महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे. सध्या त्यांनी रत्नागिरी शहर परिसरातून २८ कुत्रे ताब्यात घेतले आहेत. त्यात कोकण नगर परिसरातून कालच ६ कुत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोकण नगर परिसरात एका कुत्रीने १० जणांना चावा घेतल्याची माहिती श्री.फैसल मुल्ला यांनी ऍनिमल हेल्प ग्रुप रत्नागिरी यांना दिली आणि या ग्रुप चे सदस्य सनील डोंगरे, सनिकेत वारेकर, ईशान खानोलकर, विघ्नेश अनभवणे,अनिरुद्ध गोगटे यांनी तात्काळ तिथे पोहचत त्या भटक्या कुत्रीला पुढील उपचारासाठी ताब्यात घेतले. श्री.फैसल मुल्ला यांनी सुध्दा जातीनिशी हजर राहून सहकार्य आणि सदर कामाचे कौतुक केले तसेच अश्या प्राणी मित्रांच्या ग्रुप आणि नगर परिषद प्रशासन एकत्र येऊन भविष्यात एक चांगले संघटित काम उभे करता येईल जेणेकरून का भटक्या प्राण्यांमधील आणि माणसांमधील चाललेला संघर्ष कमी होईल. ह्या पद्धतीने एक चांगल्या सुनियोजित शहराकडे आपली वाटचाल होऊ शकते. हे काम करत असताना या संस्थांना कोणतेही आर्थिक मदत मिळत नाही प्राणीमित्रांना हे काम योग्य तऱ्हेने करण्यासाठी भविष्यात शेल्टर हाऊस,रेस्क्यु व्हॅन अशी काही उपकरणे तसेच औषध उपचार साठी साधने आणि त्या प्राण्यांसाठी खाणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.रोहन वारेकर यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
07:52 PM 20/Oct/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here