महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या भेटीत रत्नागिरी जिल्ह्याला अनोखी भेट जाहीर करतील असा विश्वास रत्नागिरीकरांकडून व्यक्त होत आहे. रत्नागिरीला आ. उदय सामंत रूपाने सहपालकमंत्री पद मिळेल का? अशी सवाल केला जात आहे. याचेच संकेत मुख्यमंत्री गणपतीपुळे भेटीत द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एखाद्या कॅबिनेट मंत्री असलेल्या आमदारांना त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले नसेल तर त्या आमदारांना त्यांच्या जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद देण्याची तरतूद असल्याचे यापुष्ट्यर्थ सांगितले जात आहे.
