जिल्ह्यात आजसाठी उपलब्ध असलेल्या लसीकरण स्लॉटची माहिती

0

रत्नागिरी : दि. २० ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ७.१० वाजता को-विन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यात खालील ठिकाणी गुरुवारी (२१ ऑक्टोबर) लसीकरणाचे स्लॉट ऑनलाइन उपलब्ध आहेत. ज्यांचे लसीकरण व्हायचे आहे, त्यांना तातडीने https://www.cowin.gov.in/ पोर्टलवर जाऊन बुकिंग करून लस घेता येईल.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय – योगा हॉल, कोविशिल्ड लस (१८ वयोगट), पहिल्या डोससाठी ४५, दुसऱ्या डोससाठी ४८ लशी उपलब्ध.
झाडगाव अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र, रत्नागिरी (UPHC 1), कोविशिल्ड लस (१८ वयोगट), पहिल्या डोससाठी ४८, दुसऱ्या डोससाठी ४९ लशी उपलब्ध.
कोकणनगर अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र, रत्नागिरी (UPHC 1), कोविशिल्ड लस (१८ वयोगट), पहिल्या डोससाठी ४८, दुसऱ्या डोससाठी ४८ लशी उपलब्ध.
देवरूख ग्रामीण रुग्णालय – कोविशिल्ड लस (१८ वयोगट), पहिल्या डोससाठी ४६६, दुसऱ्या डोससाठी ४७० लशी उपलब्ध.
चिपळूण अर्बन प्राथमिक आरोग्य केंद्र (UPHC1) – कोविशिल्ड लस (१८ वयोगट), पहिल्या डोससाठी १८९, दुसऱ्या डोससाठी १९० लशी उपलब्ध.
ऑनलाइन बुकिंग सुरू असल्याने येथे दिलेली आकडेवारी काही मिनिटांत बदलू शकते, याची कृपया नोंद घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:32 AM 21-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here