आजच्या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल; हे यश 130 कोटी जनतेचं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली : देशातील लसीकरणाने आज 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानलं आहेत. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.देशाने आता कोरोना लसीच्या 100 कोटी डोसचे सुरक्षा कवच प्राप्त केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “सबका प्रयास ही जी गोष्ट आहे ही सामूहिक इच्छाशक्तीच्या आधारे साध्य करता येते. आजचे यश हे देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, शास्त्रज्ञ, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, लस वाहतूक करणारे कर्मचारी तसेच 130 कोटी देशवासियांच्या सामूहिक इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या नंतरच्या काळातही रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तातडीने उपचार मिळावा याकडे आपले लक्ष असेल.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:46 PM 21-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here