मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना आठवड्याभरासाठी मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी पीएमएलए कोर्टानं तूर्तास कोणतंही वॉरंट जारी न करण्याचे निर्देश देत खडसेंना नियमित जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. आपण सध्या प्रकृती अस्वस्थ्यानं त्रस्त असून तूर्तास कोर्टात हजेरी लावू शकत नसल्याचं त्यांनी कोर्टाला कळवलं. खडसे हे सध्या मुळव्याधानं त्रस्त असल्याचं त्यांच्या वकिलांनी हायकोर्टाला सांगितलं. यावर हायकोर्टानं त्यांना आठवड्याभराचा अवधी देत, सत्र न्यायालयात दाद मागण्यासाठी आठवड्याचा अवधी दिला आहे. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:03 PM 21-Oct-21