अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यासह एनसीबीच्या कार्यालयात दाखल

0

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहेत. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबीच्या रडारवर आली आहे. आज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. गुरुवारी म्हणजेच आज एनसीबीचे पथक तपासासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले होते. एनसीबीने अनन्या पांडेच्या वांद्रे येथील अनन्याच्या घरातून शोध घेतल्यानंतर एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी मन्नत पोहोचले होते. एनसीबीच्या पथकाने अनन्याच्या घरातून काही दस्तावेज ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर अनन्याला एनसीबी ने समन्स बजावून आज दुपारी दोन वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ती उशिरा म्हणजेच ४.१५ वाजताच्या सुमारास बॅलार्ड पिअर येथील एनसीबी कार्यालयात आपल्या वडिलांसोबत चौकशीसाठी हजर राहिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:23 PM 21-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here