साडवली : देवरूख नजीकच्या मुरादपूर गावातील युवा कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी मंगळवारी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुरादपूर येथे हा पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम, मोर्डे गणाचे प्रमुख अनंत बांडागळे, सचिन बांडागळे, भाई बांडागळे यांच्या विशेष प्रयत्नातून तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव यांच्या नेतृत्वाखाली येथील युवा कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. प्रवेशकांमध्ये मुरादपूर गावचे माजी उपसरपंच रत्नाकर बांडागळे, पंकज चौगुले, अनंत पवार, महेंद्र बांडागळे, रवींद्र बांडागळे, अविनाश बांडागळे, महेश पंदेरे, चंद्रकांत रेवाळे, बबन रेवाळे आदी ग्रामस्थांचा समावेश आहे. तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सुधीर यशवंतराव, विजय गुरव, यशवंत गोपाळ, श्री. मोहिरे आदी उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:54 PM 21-Oct-21