नेट-सेट संघर्ष समितीकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सत्कार

0

मुंबई : राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळत नव्हता. जवळपास 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागल्याच्या पार्श्वभूमीवर नेट-सेट संघर्ष समितीच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. श्री. सामंत म्हणाले की, यामध्ये जे अध्यापक 23 ऑक्टोबर 1992 ते 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त होते अशांना हे निवृत्तीवेतन देण्यात येईल. शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2001 व 27 जून 2013 नुसार उपरोक्त कालावधीतील बिगर नेट-सेट अध्यापकांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरु ठेवण्यात आल्या असल्याने त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक गृहीत धरुन सेवानिवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. प्रा. डॉ. गोविंद काळे म्हणाले, नेट-सेट संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्यावतीने १९९८ पासून सतत संघर्ष सुरू होता. विद्यापीठ, युजीसी, महाराष्ट्र शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू होता. जवळपास 25 वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. गेल्या वर्षभरात सामंत यांनी सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठका घेऊन आम्हाला न्याय दिला आहे. नेट-सेट संघर्ष समितीचे राज्यातील विविध भागातील पदाधिकारी यांच्या वतीने सामंत यांचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीचा फोटो, सन्मान पत्र देवून व कवड्याची माळ घालून सत्कार करण्यात आला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:01 PM 21-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here