रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी आणखी १३ उमेदवारांनी १९ अर्ज सादर केले आहेत. विद्यमान पॅनेलच्या विरोधात उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संचालक चंद्रकांत बाईत यांनीदेखील गुहागर तालुका मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केला आहे. लांजा तालुका मतदारसंघातून संजय आयरे, माजी संचालक सुरेश साळुखे, गुहागर तालुका मतदारसंघातून चंद्रकांत बाईत, संगमेश्वर तालुका मतदार संघातून राजेंद्र सुर्वे, राजापूर तालुका मतदारसंघातून संचालक महादेव सप्रे, जिल्हास्तरीय कुक्कुटपालन मतदार संघातून सचिन बाईत, जिल्हास्तरीय दुग्धविकास मतदारसंघातून अजित यशवंतराव,मतदारसंघातून हरेश्वर कालेकर, जिल्हास्तरीय महिला राखीवमधून सौ. स्नेहल बाईत, श्रीमती नेहाली नागवेकर, जिल्हास्तरीय नागरी पतसंस्था मतदारसंघातून अॅड. सुजित झिमण, जिल्हास्तरीय मजूर मतदारसंघातून राकेश जाधव, गृहनिर्माणमधून अॅड.दीपक पटवर्धन यांनी आपले अर्ज गुरूवारी दाखल केले आहे. विद्यमान संचालक राजेंद्र सुर्वे यांनी चार; अॅड. सुजित झिमण, राकेश जाधव, अजित यशवंतराव यांनी प्रत्येकी दोन; अॅड.दीपक पटवर्धन, नेहाली नागवेकर, स्नेहल बाईत, हरेश्वर कालेकर, सचिन बाईत, महादेव सप्रे, सुरेश साळुखे, चंद्रकांत बाईत, संजय आयरे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. शुक्रवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे. आतापर्यंत ३९ उमेदवारांनी ६० अर्ज दाखल केले आहे. विद्यमान संचालक मंडळाविरोधात आता नाराजी उफाळून येऊ लागली असून बिनविरोध निवडणूक होऊ नये, यासाठी अर्ज भरणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 22-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here