शिक्षण संस्थांमधील नामफलक मराठीत लावण्याचे ना. उदय समंतांनी दिले आदेश

0

रत्नागिरी : शिवसेनेचे उपनेते तथा उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांनी मराठीच्या मुद्दयाला हात घातला आहे. आपल्या खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयं अर्थसहायित विद्यापीठे आणि सर्व शासकीय, अशासकीय, अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये व परिसंस्था तसेच तंत्र शिक्षण संचालनालयाच्या व कला संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्र निकेतने व तत्सम शैक्षणिक संस्था यामध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेतून लावण्यावण्याची सक्ती केली आहे . तसा शासन निर्णय काढण्यात आला आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व अकृषी विद्यापीठे, सर्व अभिमत विद्यापीठे, सर्व स्वयं अर्थसहायित विद्यापीठे आणि सर्व शासकीय/ अशासकीय, अनुदानित/ विना अनुदानित/कायम विना अनुदानित तसेच मॉडेल डिग्री महाविद्यालये व परिसंस्था, तसेच तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय यांच्या अधिपत्याखालील शासकीय, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था यामध्ये लावण्यात येणारे नामफलक मराठी भाषेतून लावण्यात यावेत. ज्या ठिकाणी नामफलक इंग्रजी भाषेमध्ये लावण्यात आले आहेत तेथे सुध्दा सदर फलक इंग्रजी भाषेसह मराठी भाषेत लावणे आवश्यक राहील. सर्व संचालक व संबंधीत विद्यापीठे यांनी त्यांच्या अधिनस्त महाविद्यालये/तंत्रनिकेतने/ परिसंस्था यांना उपरोक्त सूचना आपल्या स्तरावरुन तात्काळ कळवाव्या. तसेच सर्व * महाविद्यालये/तंत्रनिकेतने/ परिसंस्था यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.. आदेशाचे सर्व शैक्षणिक संस्थांकडून काटेकोरपणे पालन करण्यात यावे. याबाबत संबंधित संस्थेचे प्राचार्य/ सहसंचालक, उच्च शिक्षण/तंत्र शिक्षण यांनी वैयक्तिक लक्ष देऊन खात्री करावी. असे आदेश देण्यात आले आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here