सामंतांच्या प्रयत्नामुळे रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह येथील सावरकर यांची कोठडी 26 फेब्रुवारीला होणार सर्वांसाठी खुली

0

रत्नागिरी जिल्हा विषेश कारागृह येथे असणारी स्वातंत्र्य वीर सावरकर यांची ऐतिहासिक कोठडी सुरक्षेच्या कारणामुळे नागरिकांना पाहण्यासाठी बंद केली होती.सदर कोठडी सर्व त्या सुरक्षेच्या उपाययोजना करून पुन्हा नागरिकांना पाहण्यासाठी खुली करावी ह्या साठी जिल्हा विशेष कारागृह चे अशासकीय सदस्य श्री सौरभ मलुष्टे यांनी नामदार उदयजी सामंत याना विनंती केली होती,तात्काळ ह्या संदर्भात नामदार उदायजी सामंत यांनी कारागृह चे विशेष पोलीस महानिरीक्षक याना फोन करून लोकांच्या भावनेचा आदर करून व सर्व ते सुरक्षेच्या उपाययोजना करून आपण सद्या तरी 26 फेब्रुवारी ला सावरकर यांचा पुण्यतिथी दिवशी कोठडी सर्वांसाठी खुली करावी.मा मंत्री साहेबानी केलेल्या सूचनेनुसार कारागृह चे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दीपक पांडे साहेब यांनी रत्नागिरी च्या कारागृह चे अधीक्षक श्री देशमुख साहेब याना सदर कोठडी 26 फेब्रुवारी ला सर्वांसाठी खुली करावी असे आदेश दिले आहेत.ह्याच संदर्भात काही सामाजिक संस्था ने ही सदर कोठडी नागरिकांसाठी खुली करावी ह्या साठी निवेदन दिलं होतं.नामदार उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न करून सदर कोठडी 26 फेब्रुवारी ला सर्वांसाठी खुली केल्याबद्दल नागरिकांनी त्यांचे धन्यवाद दिले आहेत.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here