जिल्ह्यात शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार – निशादेवी वाघमोडे

0

रत्नागिरी : रविवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून १४ हजार ६७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले. जिल्ह्यातील १३२ केंद्रावर परीक्षा शांततेत व सुरळित पार पडला. पूर्व माध्यामक शिष्यवृत्ती पराक्षा इयत्ता पाचवीसाठी तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात सर्वत्र एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात आली. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून पाचवीसाठी १ हजार ७४३ शाळांमधील ९ हजार ४६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. प्रत्यक्षात ९ हजार ३७४ विद्याथ्यांनी ही परीक्षा दिली. इयत्ता आठवीसाठी ४५१ शाळांमधील पाच हजार ३६५ विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. ५ हजार ३०१ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले. जिल्ह्यातील सर्व केंद्रावर परीक्षा शांततेत व सुरळित पार पडल्याची माहिती शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांनी दिली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here