खेडमध्ये दीपावली निमित्ताने ‘मनसे’तर्फे विविध स्पर्धा

0

खेड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून यावर्षी देखील दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून विविध स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. या स्पर्धात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून खेडमध्ये दीपावली निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आकाश कंदील बनवणे स्पर्धा, रंगावली स्पर्धा आणि किल्ला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा खेड तालुका मर्यादित असणार आहेत. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी विनय माळी, अभिजीत कदम यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आकाश कंदील व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे तीन जणांना एक हजार रुपये, आठशे रुपये व पाचशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. किल्ला बनवण्याच्या स्पर्धेत विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये व एक हजार पाचशे रुपयांची बक्षीस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागासाठी ४ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे परीक्षण ५ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत होईल. कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या स्पर्धा होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:33 PM 22-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here