मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उमरठ, पोलादपूर येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याच्या त्रिशताब्दी सुवर्ण महोत्सव आणि त्यांच्या जिर्णोद्धार केलेल्या समाधी स्थळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांदीची तलवार देऊन त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
